Brahmastra shooting will start soon – ब्रह्मास्त्रच्या शूटिंगला होणार ऑक्टोबरपासून सुरुवात

Brahmastra shooting will start soon

एमपीसी न्यूज – करोनाने सध्या सगळ्यांनाच लॉकडाऊन करुन टाकले आहे. इतर क्षेत्राप्रमाणेच मनोरंजन क्षेत्र देखील ठप्प झाले आहे. मात्र आता सध्या काही प्रमाणात शूटिंग सुरु झाली आहेत. योग्य ती काळजी घेऊनच शूटिंग होत आहे. बहुचर्चित फॅन्टसी ड्रामा ‘ब्रह्मास्त्र’चे शूटिंग ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाच्या उर्वरित 26 दिवसांच्या शेड्यूलला दोन शिफ्टमध्ये शूट करण्याची तयारी केली आहे. यासाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्‌टला दोन-दोन शिफ्टमध्ये काम करावे लागेल.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाउनमुळे ब्रह्मास्त्रची शूटिंग मार्चपासून थांबले आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार अयानने शूटचे शेड्यूल दोन भागात विभागले आहे. गोरेगाव फिल्म सिटीमध्ये चित्रपटांसाठी दोन सेट तयार केले जातील. यातील एक क्रोमा बेस्ड असेल. अयानने सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत एक आणि चार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत दुसरे अशा 5-5 तासांच्या शिफ्ट ठरवल्या आहेत. करन जोहरला चित्रपट जून 2021 पर्यंत रिलीज करायचा असल्यामुळे अयान डिसेंबरपर्यंत शूटिंग पूर्ण करणार आहे.

करोनाची साथ आटोक्यात आल्यास ऑक्टोबरपासून शूटिंग पुन्हा सुरु होईल. अयानच्या दोन्ही सेटवर कमीत-कमी क्रु असेल आणि सरकारच्या गाइडलाइन्सनुसार काम होईल. मात्र सध्या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याबाबत साशंकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1