PMPML : पीएमपीएलचा ब्रेक फेल, चालकाने प्रसंगावधान राखून कठड्याला गाडी धडकवली, 6 प्रवाशी जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील धनकवडी परिसरातील शाहू बँक चौकामध्ये ब्रेक फेल झाल्याने चालकाने पीएमपीएमएल बस बी आर टी मार्गलगत असलेल्या कठड्याला धडकवली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत बसमधील (PMPML) सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कात्रज बस स्थानकातून लोहगावकडे जाणारी एक बस बिआरटी मार्गकडून जात होती. धनकवडी परिसरात आल्यानंतर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून उड्डाण पुलाच्या खालील बीआरटी मार्गालगत असलेल्या कॉलमला बस धडकली. ही बस (PMPML) लगेच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. बसच्या पुढील बाजूच्या काचा फुटल्या आणि उजवी बाजू अपघातग्रस्त झाली. यामध्ये सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते.

 

 

 

धनकवडी परिसरातील हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. अनेक वाहनांची या ठिकाणाहून ये – जा होत असते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस (PMPML) धडकविल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या सहकारनगर पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केले. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.