Breaking News : भीमा नदीत झालेल्या सामूहिक आत्महत्येचे उलगडले कारण

एमपीसी न्यूज- पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. ही घटना काल उघडकीस आली होती. आज या घटनेचे कारण समोर आले आहे. मयताच्या मुलाने नात्यातील  मुलगी पळवून नेल्याच्या रागात  कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या (Breaking News) केली .

17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

निघोज गावातील मोहन यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय 20) याने नात्यातील मुलीला 17 जानेवारी रोजी पळवून नेले होते.अनिलने मुलीला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी मोठा मुलगा राहुल पवार यास,  तुझ्या छोट्या भावाने मुलगी पळवून नेली आहे, त्यामुळे ती परत आणण्यास त्याला सांग, अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू, असे सांगितले होते. त्यानंतर त्या दिवशी रात्री मोहन हे त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन समाजात बदनामी होईल, या भीतीने निघून गेले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे आहेत. हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर  वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात या एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि  22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून अधिक (Breaking News) तपास करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.