Pimpri News:  ‘बीआरएसपी’च्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर बीआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.(Pimpri News) आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सामजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, सामजिक न्याय विभागाच्या महिलाध्यक्षा गंगा धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, महिलाध्यक्षा मंजुषा गायकवाड, रमेश शिंनगारे, धनंजय वैरागे, रोशन सोनवणे, बाबू साबळे, रघु गव्हाळे, सनी कांबळे लखन कांबळे आकाश शिंदे शुभम शिंदे शिवकुमार बनसोडे अल्ताफ नदाफ यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सामाजिक न्याय विभागात प्रवेश केला.

Chinchwad Crime: चिंचवडगावात कोयता हातात फिरवत गोंधळ घालणाऱ्यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्व समाजातील घटकांना व सामान्य माणसाला न्याय देऊ शकतो हा विश्वास यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.(Pimpri News) यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. सर्वांनी एकत्रित सामाजिक उन्नती साठी प्रयत्न करूयात असा विश्वास दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.