गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Chinchwad Crime: चिंचवडगावात कोयता हातात फिरवत गोंधळ घालणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज : चिंचवड गावात दोघांनी एका तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला व कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. (Chinchwad Crime) ही घटना रविवारी (दि. 14) सायंकाळी काकडे पार्क, चिंचवडगाव येथे घडली. या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

मंगेश नंदकुमार सांगळे (वय 21, रा. चिंचवडगाव), गणेश सुरेश सुगडे (वय 21, रा. केशवनगर, चिंचवड) अशी  अटक आरोपींची नावे आहेत. विश्वजित आजिनाथ भोसले (वय 20, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणाची चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Free bus pass: मी पीएमपीएमएलचा प्रवासी स्पर्धेतील विजेत्यांना मोफत बस पासचे वितरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. त्यांच्यात शनिवारी (दि. 13) किरकोळ कारणावरून बाचाबाची आणि भांडण झाले. त्या कारणावरून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी कोयता घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आले.(Chinchwad Crime) त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा शिवीगाळ करून कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली. त्यांनतर जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. चिंचवड पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news