Free bus pass: मी पीएमपीएमएलचा प्रवासी स्पर्धेतील विजेत्यांना मोफत बस पासचे वितरण

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ व प्रवासी यांचे नाते अधिक घट्ट होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाने मी पीएमपीएमएलचा प्रवासी स्पर्धेचे आयोजन केले होते.(Free bus pass) त्यातील विजेता स्पर्धकांना स्वातंत्र्यदिनी पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील मुख्यालय येथे बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून 1 जुलै ते 31 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते ‘मोफत बस पास’ चे वितरण करण्यात आले. यावेळी पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार –पवार, महाव्यवस्थापक सुबोध मेडसिकर यांची प्रमुख उपस्थिती होते.

Tiranga Rally: युवा सेनेतर्फे थेरगाव परिसरात तिरंगा रॅली; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

या स्पर्धेत लेख, कविता, फोटो व व्हिडीओ अशा 4 संवर्गात स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रत्येक संवर्गा करिता अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता 1 वर्षाचा मोफत बस पास, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता 6 महिन्याचा मोफत बस पास व तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता 3 महिन्याचा मोफत बस पास असे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.(Free bus pass) या स्पर्धेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने 1 हजार 240 लेख, 740 कविता, 677 फोटो व 283 व्हिडीओ प्राप्त झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.