Celeb IT Raid : तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या मुंबई-पुण्यातील मालमत्तेवर आयकरचा छापा

एमपीसी न्यूज – अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल, मधु मेटे यांच्या मुंबई आणि पुण्यातील मालमत्तेवर आयकर विभागाने आज छापेमारी केली. कर वसुली आणि कर भरणा यासंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 30 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. आयकर विभागाच्या कलम 132 नुसार ही कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

आयकर विभागाला ज्या पद्धतीने माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावर ते कारवाई करतात, असं केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. राष्‍ट्रीय जनता दलाचे (RJD) नेता तेजस्‍वी यादव यांनी या कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू राष्ट्रीय मुद्यांवर आपली प्रतिक्रिया देत असतात. शेतकरी आंदोलन यासह इतर विषयांवर ते नेहमीच व्यक्त झाले आहेत. यावरून त्यांना टिकेचा सामना देखील करवा लागला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.