Pimpri : शहरातील शाळांतून दहीहंडी साजरी

एमपीसी न्यूज  –  पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी विविध उत्साहात साजरा कऱण्यात आली. भाऊसाहेब तापकीर  शाळेने गोपालकाला दहीहंडी उत्सव बाल गोपाळांनी दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात साजरा केला. दहीहंडीत पोहे, लाह्या, दही, साखर, केळी अशा अनेक मिश्रणांनी बनविलेला काला हा प्रसाद म्हणून सर्व गोपाळांना वाटण्यात आला.
 

कुमार सोहम वानखेडे ह्या पहीलीच्या मुलाने तो मान मिळविला. दहीहंडी फोडल्यानंतर श्रीकृष्णाची यथासांग पुजा करुन सामुहीक कृष्णगीत विद्यार्थ्यांनी गायन करुन हा सोहळा साजरा केला. कृष्णलिला आणि श्रीकृष्णाच्या प्राचीन गोष्टी शिक्षकांकडून सांगण्यात आल्या. शिक्षिका उल्का जगदाळे आणि जयश्री पवार यांनी संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली होती. याप्रसंगी विद्यार्थी-पालक हा सोहळा पाहायला उपस्थित होते.

रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात मुलांनी दहीहंडीचा आनंद लुटला. गोविंदा आला रे… आला…  यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्याना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला यांचे महत्व सांगितले. गणेशोत्सावात पर्यावरणपूरक वस्तूचा वापर वाढवा, पाणी वाचवा, जलसंवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यानी स्वच्छतेचा संदेश देवून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
या उपक्रमाबाबत आरती राव म्हणाल्या, दरवर्षी शाळेमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी हा संपूर्ण देशातील लोकप्रिय आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे. याची विद्यार्थ्याना माहिती व्हावी, हा आयोजनामागे हेतू असतो.
तळेगाव येथील  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये  ‘दहीहंडी’ जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात शाळेच्या मुख्याध्यापिका  प्रणाली गुरव यांच्या हस्ते कृष्ण पूजनाने  करण्यात आली.
चिमुकल्यांनी राधा कृष्णाचे वेश परिधान करून  ‘गो गो गोविंदा’ हे नुत्य सादर करून सर्वाँना नृत्यातून कृष्णाच्या नटखट लीलांचा अनुभव दिला. पूर्वा झगडे  व हर्षदा फड या विद्यार्थिनींनी ‘जारे हट नटखट’ व ‘कान्हा’ या गीतांवर नृत्य सादर करून कार्यक्रमाची  रंगत वाढविली .
यावेळी   दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली.  ‘ब्ल्यू हाउस’ च्या प्रशांत राक्षे याने सर्वात कमी वेळात दहीहंडी फोडली. त्याचबरोबर थराची  दहीहंडी फोडण्याचा आनंद ही विद्यार्थांनी घेतला.यातून विद्यार्थांना सांघिकतेचे महत्त्व  समजले. कार्यक्रमाचे संयोजन  विजया गवळी,  विना विश्वकर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन रिया कुमारी यांनी केले.  इतर शिक्षकवर्गाने व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.