Pune : केंद्र सरकार असंवेदनशील – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार असंवेदनशील असून कोणाचे काही ऐकायची पद्धत नाही. हे सरकार दडपशाहीचे असून कोणाशी बोलत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या विधानांत मोठी तफावत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. एनआरसी आणि सीएएवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

या सरकारमध्ये मतभेद असून नेमके निर्णय कोण घेते आणि सरकार कोण चालवते, असा सवालही त्यांनी केला.
पुणे महापालिकेत आढावा बैठकीनंतर पत्रकरांशी सुळे बोलत होत्या. राज्य सरकारमधील समन्वय उत्तम असून सर्व कार्यक्रमात सर्वजण एकमेकांना भेटतात. कॅबिनेटमध्ये सर्वात चांगले निर्णय होत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सर्व निर्णय चांगले होतात. मंत्रालय ओव्हर टाईम काम करत असून सात वाजल्यापासून काम सुरू होत आहे,  असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्याचबरोबर नाईट लाईफवर कोणताही मतभेद नाही. मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांचे विधान हे मॅचिंग होणार आहे.

सरकारमध्ये को-ऑर्डिनेशन असल्याचेही त्यांनी म्हटले. तर साई जन्मस्थान वादावर बोलताना साई संस्थान आणि पाथरी या संदर्भात मी फार अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मी फार बोलणं योग्य होणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी मीटिंग ठेवली आहे. त्यानंतर आपण चर्चा करण्यास संयुक्तिक राहील, असे म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.