Pune : चैतन्य कुमार बालपांडे अाजही न्यायाच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – बालपांडे याचा तीन वर्षापुर्वी त्याची आई आणि तिचा प्रियकर या दोघांनी नातेसंबंधात अडथळा ठरतो म्हणून कुमार याची निर्घृण हत्या करण्यात आली. कुमार चैतन्य तरुण बालपांडे (वय.11) याची आज तिसरी पुण्यतिथी होती.त्याचावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी आज संभाजी उद्यान ते कुटुंब न्यायालय ‘कँडल मोर्चा’ काढण्यात आला.

चैतन्याच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला असून कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कुमार चैतन्यचा ताबा त्याच्या आईकडे देण्यात आला होता. चैतन्य गतिमंद असल्याने त्याची आई राखी बालपांडे हि चैतन्य चा सांभाळ नीट करत नसे ती चैतन्यला मारहाण करत असे तसेच त्याला उपाशी ठेवत असे. राखीच्या व त्यांच्या प्रियकराच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने तीन वर्षापूर्वी राखीने व त्यांच्या प्रियकराने चैतन्याला बॅटने जबरदस्त मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत शेजाऱ्यांनी अनेकदा पोलिसात तक्रार देखील केली होती परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अखेर चैतन्यची हत्या करण्यात आली. चैतन्यचे वडील आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयाने लवकरात लवकर निकाल लावून चैतन्यला न्याय द्यावा यासाठी धडपड करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.