Chakan: ‘योगेश सिल्क’च्या नूतन वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी बुधवारी अवतरणार ‘अप्सरा’!(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – कासारवाडी आणि आकुर्डी येथील भव्य वस्त्रदालनांच्या अफाट लोकप्रियतेनंतर आता चाकण परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी ‘योगेश सिल्क’ हे नवीन वस्त्रदालन येत्या बुधवारपासून (29 जानेवारी) सुरू होत आहे. चाकणकरांना लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी पुण्यात आणि येवल्यात जाण्याची गरज भासणार नसून एकाच छताखाली बस्ता खरेदी करता येणार आहे. अशा या परिपूर्ण वस्त्रदालनाच्या शुभारंभ प्रसंगी ‘अप्सरा’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची उपस्थिती हे विशेष आकर्षण असणार आहे.

चाकण बाजारपेठेत शिवाजी विद्यामंदिराच्या समोर ‘पृथ्वीप्रस्थ’ या व्यापारी संकुलात ‘योगेश सिल्क’ हे भव्य वस्त्रदालन सुरू करण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता नामवंत अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार सुरेश गोरे,ज्ञानेश्वर लांडगे, पूजा महेश लांडगे , श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक तथा पिंपरी महापालिकेचे माजी शहरअभियंता शांताराम गराडे, पवना बँकचे संचालक विठ्ठल काळभोर, राम कांडगे ,दादा इंगवले या मान्यवरांच्या हस्ते दुकानाचे उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आर. जे. अक्षय घोळवे हे ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी स्पर्धात्मक मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यातील प्रथम पाच विजेत्या महिलांना ‘योगेश सिल्क’च्या वतीने खास पैठणी देऊन गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना ‘लकी ड्रॉ’द्वारे आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील अग्रगण्य असलेल्या ‘योगेश सिल्क’ने चाकण परिसरातील ग्राहकांच्या मागणीनुसार चाकण बाजारपेठत भव्य वस्त्रदालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत दर्जेदार,आकर्षक तसेच कलात्मक साड्या व कपड्यांचे असंख्य प्रकार व ते देखील माफक किमतीत उपलब्ध करून देत असल्याने ‘योगेश सिल्क’ला ग्राहकांकडून पसंती मिळते. महिलांप्रमाणेच पुरुषांसाठी नामांकित कंपन्यांचे सूटींग-शर्टिंगचे कापड तसेच जोधपुरी पासून ते शेरवानी देखील उपलब्ध असून त्यावरील कपड्यांची शिलाई ‘फ्री’ आहे. उत्पादकाकडून थेट ग्राहकापर्यंत साड्या, पैठणी व अन्य कपडे पोचविण्यात येत असल्याने ग्राहकांचाही फायदा होतो, अशी माहिती ‘योगेश सिल्क’चे संचालक योगेश अग्रवाल यांनी दिली.

‘योगेश सिल्क’च्या चाकण येथील वस्त्रदालनाला भेट देऊन वस्त्रखरेदीचा खरा आनंद सर्वांनी अनुभवावा, असे आवाहन मोतीराम रामदयाल अग्रवाल, कृष्णलाल रामदयाल अग्रवाल, योगेश मोतीराम अग्रवाल, अमित मोतीराम अग्रवाल,प्रशांत गराडे, मनोज माणिकचंद दायमा यांनी केले आहे.

लोकेशन मॅप

https://www.google.com/maps?q=18.7641972,73.8643384&z=17&hl=en

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.