Chakan Crime News : काळविटाची शिकार करून शिंगे विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक तारेच्या सहाय्याने काळविटाची शिकार करून शिंगे विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव घेनंद फाटा, शेवगाव ( ता. खेड ) याठिकाणी शुक्रवारी (दि.2) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पोलीस नाईक लक्ष्मण नानाजी आढारी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गजानन राठोड (वय 22, रा. यवतमाळ) व सागर रामराव मात्रे (वय 23, रा. यवतमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इलेक्ट्रॉनिक तारेच्या सहाय्याने काळविटाची शिकार केली. व पाच जोड शिंगे विक्रीसाठी जवळ बाळगली होती. शिंगे विक्री साठी जात असताना आढळून आले. या शिंगांची किंमत पाच लाख रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.