Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 52 नव्या रुग्णांची नोंद; 73 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.3) 52 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 73 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.

आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 498 इतकी आहे. रुग्ण संख्या कमी होत आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 754 आहे. शहरी भागात 26 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 17 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 04 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आता पर्यंतची एकूण संख्या 24,242 झाली आहे. तर दिवसभरात 73 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वरसोली व कामशेत येथे प्रत्येकी 05, आंबळे येथे 03, काले, वेहेरगाव, सोमाटणे, धामणे, कार्ला, गोवित्री, चिखलसे, पिंपळोली, आंबी, इंदोरी, तळेगाव दाभाडे ग्रामीण, वराळे व थोरण येथे प्रत्येकी 1 असे एकूण 26 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 22,989 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,708 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,065 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,244 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13017 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,225 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.83 टक्के आहे तर मृत्यू दर 2.05 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 183 लोणावळा नगरपरिषदमध्ये 97 वडगाव नगरपंचायतमध्ये 44 व ग्रामीण भागात 430 असे एकूण 754 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.