Chakan Crime News : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गांजा बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली गावात करण्यात आली.

मनोज युवराज रूम (वय 34, रा. आंबेठाण, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई शरद खैरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, भांबोली गावातील भांबोली फाटा ते वराळे गावाकडे जाणाऱ्या रोडवर एकजण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे गांजा आहे. या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी सापळा लावून आरोपी मनोज याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 22 हजार 720 रुपये किमतीचा एक किलो 136 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत मनोज याला अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.