Pimpri News : वल्लभनगर आगाराच्या वतीने साडेतीन शक्तिपीठ दर्शन बस

एमपीसी न्यूज – वल्लभनगर, पिंपरी चिंचवड आगाराच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तिपीठ दर्शन बस सोडण्यात येणार आहे. 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान ही बस दर्शनासाठी रवाना होणार आहे.

वल्लभनगर आगाराच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.09) दर्शन बस सकाळी सहा वाजता वल्लभनगर बस स्थानकावरून सुटेल, शिवाजीनगर मार्गे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन बस तुळजाभवानी माता दर्शनासाठी रवाना होईल. तुळजापूरमध्ये मुक्काम असेल. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी सकाळी बस रेणुकादेवी दर्शनासाठी बस रवाना होईल. तेथे मुक्काम करून 11 ऑक्टोबर रोजी सप्तशृंगीगड वणी येथे दर्शनासाठी रवाना होईल आणि 12 ऑक्टोबरला बस परत पिंपरी चिंचवड येथे येणार आहे.

साडेतीन शक्तीपीठ दर्शन बसचे बुकिंग सुरू असल्याची माहिती आगाराच्या वतीने देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना नियमांचे पालन बंधनकारक असेल. या प्रवासासाठी येणारा तिकीट खर्च आणि इतर माहिती आगारात उपलब्ध आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.