BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : भरधाव वाहनाच्या धडकेत एकाच मृत्यू

अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका पंचावन्न वर्षीय अनोळखी इसमास चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी बुद्रुक ( ता. खेड ) गावच्या हद्दीत बुधवारी ( दि. 9 जानेवारी ) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडला.  मात्र, या अपघाता नंतर सबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनाससह घटनास्थळावरून तसाच पुढे निघून गेल्या प्रकरणी येथील पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर रात्री उशिरा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णवाहिका चालक बाबासाहेब राजाराम पोटवडे ( वय – 35 वर्षे,  रा. काळूस, ता. खेड ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी बुद्रुक ( ता. खेड ) गावच्या हद्दीत बुधवारी ( दि. 9 जानेवारी ) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान एक अनोळखी इसम पायी जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून  भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यास जोराची ठोस दिल्याने तो गंभीर जखमी होवून रक्तबंबाळ अवस्थेत मरण पावला. सबंधित इसमाच्या अंगावर काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, नेसणीस काळ्या रंगाची पँँट, डोक्याचे केस पांढरे आहेत. त्याच्या जवळ ओळखीचा असा कसलाच पुरावा सापडला नसल्याने अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.