Chakan News: कंपनीतून घरी जात असलेल्या तरुणाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

फिर्यादी महेश यांचा मृत मित्र ऋषिकेश म्हाळुंगे येथील एका कंपनीत काम करत होता. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तो कामावरून त्याच्या दुचाकीवरून (एमएच 01 एचए 3436) म्हाळुंगे येथील घरी जात होता.

एमपीसी न्यूज – कंपनीतून दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणाला भरधाव आलेल्या एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.9) दुपारी साडेतीन वाजता तळवडे-म्हाळुंगे रोडवर घडली.

ऋषिकेश बाळू लोखंडे (वय 22, रा. म्हाळुंगे. मूळ रा. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महेश पांडुरंग ढोबळे (वय 27) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोपट किसन काशीद (रा. घोसासी कान्हेरसर, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश यांचा मृत मित्र ऋषिकेश म्हाळुंगे येथील एका कंपनीत काम करत होता. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तो कामावरून त्याच्या दुचाकीवरून (एमएच 01 एचए 3436) म्हाळुंगे येथील घरी जात होता.

सिग्मा चौकात ऋषिकेश याच्या दुचाकीला आरोपीच्या टेम्पोने (एमएच 14 एएस 9785) या टेम्पोने जोरात धडक दिली. यामध्ये ऋषिकेश गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.