Chakan News : चाकण मध्ये लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी

एमपीसी न्यूज – मागील अनेक दिवस लसी उपलब्ध नसल्याने बंद असलेले लसीकरण शुक्रवारी (दि.20) लसी उपलब्ध झाल्याने चाकण मध्ये सुरु झाले. मात्र अद्याप लसींंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी पहाटे पासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

चाकण येथील लसीकरण केंद्रांवर सकाळी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी पहाटे पासून लसीकरण केंद्रावर हजेरी लावली होती. मोठी गर्दी होत असल्याने लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.

चाकण मधील लसीकरण केंद्रावर 200 कोव्हीशिल्ड आणि 600 कोव्हॅक्सीन लसी उपलब्ध झाल्या होत्या. मागील काही दिवसांपासून चाकण शहरात लसींचा संपूर्ण तालुक्यात सर्वात कमी लसींचा पुरवठा होत आहे. लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने अनेक जण लस घेण्यापासून वंचित राहत आहेत. त्याच प्रमाणे लसीकरणाला देखील ब्रेक लागत आहे. अशातच अचानक एखाद्या दिवशी लसी उपलब्ध झाल्यानंतर त्या मिळवण्यासाठी नागरिक प्रचंड गर्दी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.