Chakan News : रासे येथील तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यामधील रासे  गावातील एका (Chakan News ) शनिवारी सकाळी कडाचीवाडी गावच्या हद्दीतील एका झाडाला दोर अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

नवनाथ दत्तात्रेय वाडेकर (वय 32) असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

 

नवनाथ हा तीन-चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याबाबत पोलिसात फिर्याद दिली होती. शनिवारी सकाळी कडाचीवाडी गावच्या हद्दीतील एका दुकानासमोरील झाडाला दोरी अडकवून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

 

परंतु, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच परिसरात पाच -सहा वर्षांपूर्वी त्याने (Chakan News ) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तो वाचला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.