Chakan : चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होईना; अनुदानापासूनही वंचित राहण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : कांद्याच्या दरात एकीकडे सुधारणा होत (Chakan) नसताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या अनुदानातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याची 13000  पिशवी म्हणजेच 6500 क्विंटल आवक झाली.

कांद्याला प्रतवारीनुसार 600 ते 1100 रुपये एवढा प्रतीक्विंटलला भाव मिळाला. लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्विटला 350 रुपये अनुदान जाहीर केले. मात्र त्यासाठी सातबारा उताऱ्यावर कांदा नोंदीची सक्ती असल्याने 60 ते 70 टक्के या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खेड तालुक्यात शेतकऱ्यांनी अशी नोंदणीच केलेली नसल्याने कांदे विक्री (Chakan) करूनही अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जाचक अटी शिथिल करण्याची मागणी होत आहे.

Pune : 5 वर्षांपासून फरार कुख्यात गुन्हेगाराला घरात घुसून ठोकल्या बेड्या

शासनाने अनुदानासाठी ठरवून दिलेल्या मुदतीत कांदा मार्केट मध्ये विक्री करण्याची स्पर्धा होऊन मागील आठवड्यात चाकण मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कांदा आवक झाली. मात्र, त्यानंतर कांद्याच्या आवकेत सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुढील काळात कांद्याचा तुटवडा जनावर असल्याचा कयास देखील लावला जात आहे.

दरम्यान चाकणमध्ये 3200 पिशवी बटाट्याची आवक होऊन 900 ते 1300 रुपये एवढा बटाट्याला प्रतीक्विंटलला भाव मिळाला. तर, नवीन गावरान बटाट्याला 800 ते 1100 रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.