Pune Crime News : बलात्कारातील आरोपीला चाकण पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार चाकण पोलिसांनी बलात्कारातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धनराज लोकेश राठोड (वय 28 वर्ष, रा.चंदापूर, कर्नाटक) असे अटक आरोपीचे नाव असून चाकण पोलीस (Pune Crime News)  ठाण्यात 30 वर्षीय पिडीत महिलेने याविरोधात मंगळवारी (दि.12) तक्रार दिली होती.

Kamshet News : कामशेत-वडिवळे रस्त्यावरील पूल पाण्याखाली,आठ गावांचा संपर्क तुटला

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या अल्फा प्रायलेट लिमीटेड हरियन, माणकुली येथे कामास होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांचे फोटो काढले. हे फोटो पिडीतेच्या नवऱ्याला दाखवण्याची धमकी देत पिडीतेवर मार्च ते जुलै 2022 या चार महिन्यात भिंवडी व महाळुंगे परिसरात बलात्कार (Pune Crime News)  केला. यावेळी आरोपीने पिडीतेला तिच्या पतीला मारून टाकण्याची धमकीही दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.