YCMH News:  ‘पीजी इन्स्टिट्यूट’साठी उपकरणांची थेट पद्धतीने खरेदी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील  (YCMH News) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेसाठी विविध उपकरणे, साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. ही उपकरणे थेट पद्धतीने खरेदी केली जाणार असून त्यासाठी 68 लाख रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (YCMH News) सुरू करण्यात आला आहे. या संस्थेसाठी सात हायड्रोलिक टेबल खरेदी करण्यात येणार आहेत. निविदा न मागविता पुण्यातील बायोरिसोर्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून थेट पद्धतीने हे टेबल खरेदी करणार आहे. त्यांनी एका टेबलसाठी 1 लाख 39 हजार 500 रुपये दर सादर केला. त्यानुसार, सात टेबल खरेदीसाठी 9 लाख 76 हजार रुपये इतका खर्च होणार आहे. संस्थेसाठी 11 इलेक्ट्रो काऊट्री मशीन खरेदी करण्यात येणार आहेत.

या मशीनही निविदा न मागविता गोवा येथील ओम सर्जिकल यांच्याकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यांनी एका मशीनसाठी 5 लाख 32 हजार 613 रुपये दर सादर केला आहे. त्यानुसार, 11 मशीन खरेदीसाठी 58 लाख 58 हजार रुपये खर्च होणार आहे.

 

Uddhav Thackeray : पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे येणार? मातोश्रीवरील भेटीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय म्हणाले? 

 

दरम्यान, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेसाठी हाय व्हॉक्युम सक्शन मशीन खरेदीसाठी  (YCMH News) महापालिकेमार्फत निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील सेवार्ड सिस्टीम्स इन्क यांनी 1 कोटी 21 लाख रुपये इतका दर सादर केला. हा दर अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा 9.21 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे त्यांची निविदा स्वीकृत करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.