Uddhav Thackeray : पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे येणार? मातोश्रीवरील भेटीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय म्हणाले? 

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षात सध्या उभी फूट पडल्याचे चित्र आहे. 40 हुन अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि आता पक्ष भक्कम करण्यावर त्यांनी लक्ष दिले. राज्यभरातील शिवसैनिकाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सध्या मातोश्रीवर सुरू आहे. पुणे शहरातील पदाधिकारी सोमवारी मुंबईत गेले होते. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पुण्यात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्याचे सांगितले आहे. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी ही माहिती दिली. 

 

Bhide bridge : भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, वाचा काय झालं? 

 

शहरातील शिवसेना भक्कम आहे. जे गेले ते गेले त्यांच्यामुळे संघटनेला फार काही फरक पडणार नाही. आम्ही लवकरच पुण्यात मेळावा घेणार आहोत. त्याला तुम्ही येणार का? असा प्रश्न पुण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सकारात्मक प्रतिसाद देत या मेळाव्याला नक्की येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी सांगितले.
पुण्यातील माजी नगरसेवक नाना भानगिरे, माजी शहरप्रमुख अजय भोसले आणि युवा सेनेचे प्रदेश सहसचिव किरण साळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.