Bhimashankar News : रस्त्यावर डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांसोबत हे काय घडलं? वाचा…

एमपीसी न्यूज –  सध्या पावसाचे दिवस आहेत.. पुणे जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस झालाय.. नदी नाले ओसंडून वाहतात तर डोंगर देखील हिरवेगार झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होताना दिसते.  पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर (Bhimashankar News)  राज्यभरातून पर्यटक येताना दिसत आहेत. मात्र अनेक पर्यटक नियमांची ऐशी तेशी करताना दिसून येत आहेत. अशाच हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. 

 

श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar News)  येथे डीजे लावून भर रस्त्यात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या तरुणांच्या गाड्या आणि डीजे जप्त केला असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हे पर्यटक मोठ्या आवाजात डीजेवर गाणी लावून नाचत होते. त्याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या इतर पर्यटकांना होत होता. दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर धाव घेतली.

 

 

 

Panshet Dam Update: पानशेत धरणात 41 टक्के पाणीसाठा, पावसाचा जोर कायम

 

 

यावेळी पोलिसांना काही तरुण पर्यटक भीमाशंकर मंदिरात (Bhimashankar News)  प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या आवाजात डीजे लावून बिभक्त प्रकारे नाचत असताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी अचानक या ठिकाणी छापा टाकत या उलट बात करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली. त्यांना ताब्यात घेतले आणि चांगलाच चोप दिला. दरम्यान हे सर्व तरुण अवसरी आणि मंचर येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. झालेल्या सर्व प्रकाराची या तरुणांच्या घरच्यांना ही माहिती दिली जाणार असल्याचे पोलीस म्हणाले. यानंतर त्यांनी अशा प्रकारची कृत्य करू नये यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाईल, असे देखील पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.