Fire Department : पुण्यात अग्निशामक दलाकडून पाण्यात अडकलेल्या वासरू व इसमाची सुटका;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पावसाच्या पाण्यात अडकलेल्या गायीच्या वासराची व नागरीकांची अग्निशामक दलाकडून (Fire Department) सुटका करण्यात आली आहे. या घटना बुधवारी (दि.13) सकाळी घडल्या आहेत.

 

 

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवणे परिसरातील नदी पाञामध्ये मधोमध एका गायीचे वासरू अडकल्याचे स्थानिकांनी सिंहगड अग्निशमन दलाला कळवले. यावेळी त्वरीत घटनास्थळी पोहचून जवानांनी  वासराला सुखरुप बाहेर काढले. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर व जवान संतोष भिलारे, सुनिल दिवाडकर, भरत गोगावले, राकेश बरे व चालक ज्ञानेश्वर बाठे यांनी सहभाग घेतला होता.

Pune Crime News : बलात्कारातील आरोपीला चाकण पोलिसांकडून अटक

 

दुसऱ्या घटनेत एक व्यक्ती  शिवणेतील स्मशानभूमीकडून नांदेड सिटीकडे जाणाऱ्या पुलाच्या पायऱ्यावर अडकली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने विजेच्या खांबाला धरून ठेवले होते. ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात येताच याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला कळवली.यावेळी घटनास्थळी पोहचून पीएमआरडीए अग्निशामक दलाने अवघ्या 15 मिनीटात त्या व्यक्तीला दोरखंडाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

 

Pune Crime News : कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा चुकीचा वापर, चेहरा वापरून तरुणीचे पॉर्न व्हिडिओ न्यूड फोटो 

 

 

सतत पडणाऱ्या पावसामुळे पुण्याच्या आसपासची धरणे भरली आहेत.त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. पावसाचा व पाण्याचा अंदाज घेऊन गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे अवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.