Chakan : चाकण पतसंस्थेकडून सोलरसाठी वित्तपुरवठा 

एमपीसी न्यूज – सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी चाकण नागरी पतसंस्थेने (Chakan)सामान्य नागरिकांसाठी सोलर होम लाइटिंग योजनेला वित्तपुरवठा सुरु केला आहे. अत्यंत माफक व्याजदारात नागरिकांना हि सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  चाकण पतसंस्थेकडून सुरु करण्यात आलेल्या या योजनेतील पहिल्या लाभार्थ्याला शुक्रवारी (दि. 23)  वित्तपुरवठा करून धनादेश देण्यात आला.

चाकण पतसंस्थेचे संचालक नितीन गोरे यांनी सांगितले कि, सरकारच्या अनुदानासाठी, अधिकृत कंपनी निवडून त्यांच्याकडून सोलर पॅनेल बसवावे लागते. सोलर पॅनल तीन किलोवॅटपर्यंत बसवल्यास सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. 10 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर 20  टक्के सबसिडी मिळते.

Pune : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

चाकण पतसंस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. अशा प्रकारे सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी वित्तपुरवठा करणारी चाकण पतसंस्था हि खेड तालुक्यातील पहिलीच पतसंस्था ठरली आहे.  सौरउर्जेसाठीच्या पहिल्या लाभार्थ्याला धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील नायकवाडी, उपाध्यक्ष निलेश टिळेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व संस्थेचे संचालक नितीन गोरे,  चाकणचे माजी उपसरपंच व संचालक अशोक बिरदवडे, गोरक्षनाथ कांडगे, गिरीश गोरे, लक्ष्मण वाघ, राहुल परदेशी, नवनाथ शेवकरी, सुरेश कांडगे, बाळासाहेब साळुंके, प्राजक्ता गोरे व साधना गोरे, तज्ञ संचालक प्रकाश भुजबळ, निलेश जाधव, सचिव अनिल धाडगे, आदी उपस्थित होते.

कंपनीचे अधिकारी म्हणतात …
चाकण पतसंस्थेने ज्या कंपनीच्या माध्यमातून सौरउर्जा प्रकल्पासाठी वित्तपुरवठा सुरु केला आहे, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यास 10 तासात 10 युनिट वीजनिर्मिती होते.  एक महिन्यात सुमारे 300 युनिट वीज मिळेल. एकदा बसवलेले नवीन टेक्नोलॉजीचे सोलर पॅनेल 25 वर्षांपर्यंत टिकते. त्याचा मेंटेनन्स (देखभाल-दुरुस्ती) देखील परवडणारा आहे. दहा वर्षांत एकदा 20 हजार रुपये खर्चून बॅटरी बदलावी लागते. सोलरपासून निर्माण होणारी वीज मोफतच मिळते. सोलर पॅनेल बसविल्यास 25 वर्षांपर्यंत (Chakan) वीजबिल भरण्यापासून मुक्तता मिळते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.