Chakan : ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेतून ट्रक लंपास

एमपीसी न्यूज – ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेत पार्क केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याचा परिसरातील नागरिकांना मागमूस देखील लागला नाही. ही घटना सोमवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास चिंबळी फाटा येथील न्यू जय मल्हार ट्रान्सपोर्ट येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

विनायक कैलास येवले (वय 29, रा. निमगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक यांनी त्यांचा 19 लाख रुपये किमतीचा सहा चाकी ट्रक (एम एच 14 / एच जी 8061) रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास चिंबळी फाटा येथील न्यू जय मल्हार ट्रान्सपोर्ट येथे पार्क केला. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या ट्रक चोरून नेला. रविवारी पहाटे ही घटना उकडीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.