Chakan : टँकरने कामगारास चिरडले; बिरदवडीतील प्रकार

0 396

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी निघालेल्या सत्तावीस वर्षीय कामगारास भरधाव निघालेल्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याचा प्रकार चाकण एमआयडीसीमधील बिरदवडी (ता. खेड) हद्दीत सोमवारी (दि. ११) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकारानंतर सबंधित टँकरचालक घटनास्थळी न थांबता तसाच पुढे निघून गेला. चाकण पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_INPOST_R_A

रंगनाथ पंधारी बिंद (वय २७ वर्षे, सध्या रा. बिरदवडी, ता. खेड) असे या अपघातात ठार झालेल्या पादचारी कामगाराचे नाव आहे. पप्पू रामजेतेन प्रसाद (वय २८ वर्षे, रा. आरूवस्ती, बिरदवडी, राज्य- उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत अधिक माहिती अशी, पप्पू आणि रंगनाथ हे चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी ते विंदाल कंपनी या दरम्यान सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेला पाण्याचा टँकर वळण घेत असताना रंगनाथ यास जोराचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.

पप्पू याने संबंधित टँकर चालकास पकडून धरले, मात्र गर्दीचा फायदा घेऊन चालक त्याच्या हातातून निसटुन पसार झाला. पप्पू याने चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसानी सबंधित टँकरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: