_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Weather Report: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्‍यता

मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. : Chance of torrential rains in sparse places in Central Maharashtra and Marathwada Ghats

एमपीसी न्यूज – दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता असून दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : दाभोलीम (गोवा) 6, भिरा, मार्मगोवा 4 प्रत्येकी, कुडाळ, लांजा, मडगाव, रोहा 3 प्रत्येकी, कानाकोना, केपे, सांगे, वाल्पोई 2 प्रत्येकी, दोडामार्ग, मंडणगड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, वसई 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : राहुरी 5, गिरना धरण, नेवासा 4 प्रत्येकी, अकोले, माळशीरस, राधानगरी, सुरगाणा 3 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, बार्शी, भोर, चांदगड, जुन्नर, खेड राजगुरुनगर, नांदगाव, नवापूर, ओझर (नाशिक) , फलटण 2 प्रत्येकी, चाळीसगाव, दहीगाव, गगनबावडा, हातकणंगले, इगतपुरी, जामखेड, जामनेर, करमाळा, खंडाळा बावडा, कोपरगाव, महाबळेश्वर, मुळदे, पुणे (लोहगाव), संगमनेर, शेवगाव, श्री गोंडा, श्रीरामपूर, सिन्नर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : कन्नड 10, औरंगाबाद 9, गंगापूर, खुलताबाद 8 प्रत्येकी, भोकरदन, गंगाखेड, हदगाव, जाफराबाद, सिल्लोड 4 प्रत्येकी, बदनापूर, माहूर, फुलंब्री, वैजापूर 3 प्रत्येकी, औंधा नागनाथ, बीड, देगलूर, सोयेगाव 1 प्रत्येकी.

विदर्भ : अमरावती 3, अकोला, आर्णी, भिवापूर, बुलडाणा, दारव्हा, देवळी, धामणगाव, घाटंजी, गोंदिया, जळगाव जामोद, कुरखेडा, महागाव, मोर्सी, शेगाव, शिंदेवाही, उमर खेड, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (पोफळी), इंगरवाडी, अम्बोणे 3 प्रत्येकी, ताम्हिणी, कोयना (नवजा) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

_MPC_DIR_MPU_II

02 ऑगस्ट: कोंकण गोगोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

03-05 ऑगस्ट: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

02 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

03 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

04 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

05 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.