_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Charholi: दूध दरवाढीसाठी भाजपचे चऱ्होलीत आंदोलन

गायीच्या दूधाला प्रतिलीटर 10 रूपये अनुदान द्यावे. : BJP's agitation in Charholi for milk price hike

एमपीसी न्यूज – गायीच्या दूधाला प्रतिलीटर 10 रूपये अनुदान द्यावे. दूध भुकटीला निर्यात अनुदान द्या, दुधाला रास्त भाव द्या, दुधउत्पादकाला न्याय द्या, अशा मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजप आणि पिंपरी चिंचवड भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आज (शनिवारी) चऱ्होली बुद्रुक येथे दूध एल्गार आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्या व्यवसायावर गंडांतर आले असताना शेतकऱ्याच्या अर्थचक्राला गती देण्याचे काम दूध व्यवसायाने केले आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून शासनाने दूधाचे दर कमी केले. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात सुरू असलेले शेतकऱ्यांचे अर्थचक्र मंदावले आहे.

_MPC_DIR_MPU_II

आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहीली तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच दुध व्यवसायाला अधिक गती देण्याची गरज असताना तीन चाकी महाआघाडी सरकारने दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.

या आंदोलनाच्या वेळी उपस्थित जनतेला दुध वाटप करून निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, भाजपा सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्वर शेंडगे, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, शैला मोळक, कोषाध्यक्ष सचिन तापकीर, उपाध्यक्ष नंदू दाभाडे व किसान मोर्चाचे अध्यक्ष संतोष तापकीर, भोसरी चऱ्होली भाजपा मंडल अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र लांडगे, प्रभाग स्विकृत सदस्य अजित बुर्डे, दिनेश यादव, पांडा भालेकर, गीता महेंद्रू, कामगार आघाडीच्या राजश्री जायभाय, कविता करदास, भाऊसाहेब तापकीर, रामदास काळजे, भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्ता तापकीर, प्रवीण काळजे संतोष पठारे, रमेश भालेकर, बाळासाहेब पवार, कामगार आघाडीचे संजय बढे, बाळासाहेब काटे, मंगेश ताम्हाणे, शंकर बुर्डे, सचिन मोरे, किसन यादव, शांताराम तापकीर, सुरेश तापकीर, विलास तापकीर, पुरुषोत्तम जोशी, डॉ.सुधाकर काळे, गणेश तापकीर, उत्तम ताजणे, रामदास कुटे, सुनील तापकीर आजी-माजी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.