_MPC_DIR_MPU_III

Pune : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 57 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 57 हजारांची फसवणूक  केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही फसवणुक जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत  ऑनलाईऩ माध्यमाद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेगाव येथे राहणा-या एका 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
_MPC_DIR_MPU_IV
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी महिलेला जुलै महिन्यात एक फोन आला. फोनवर एका अज्ञात व्यक्तीने महिलेस नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कारणे सांगून डिपॅाझिट म्हणून तब्बल 19 हजार रूपये  ऑनलाईऩ पद्धतीने पाठविण्यास सांगितले. परंतु महिलेला त्यानंतर कोणतीही नोकरी लावून न दिल्यामुळे त्यांनी पाठवलेली रक्कम परत मागितली.
_MPC_DIR_MPU_II
त्यानंतर महिलेला अनिकेत शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना रक्कम परत मिळविण्यासाठी एक लिंक पाठवली.त्या महिलेला  त्या लिंक द्वारे दोनवेळा ऑनलाईऩ प्रक्रिया केली.आणि त्या लिंकवर महिलेच्या आईच्या बॅंक खात्याची माहिती यापुर्वी असल्याने त्याचा दुरूपयोग करून त्यांच्या आईच्या खात्यावरील पेटीएमद्वारे 38 हजार 200 हजारांची रक्कम  अशी एकूण 57 हजार 300 हजारांची फसवणुक केली.याप्रकरणी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.