Pune Crime : मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे दोघे गजाआड; एक रिक्षा, 7 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची एक रिक्षा, सात दुचाकी (Pune Crime) असा एकूण 4.5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी राजेश परळकर, वय 30 वर्षे रा. सुखसागर नगर, कात्रज पुणे या आरोपीला अटक करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी भैरट यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे हे पोलिसांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सातारा रोडवरील कदम प्लाझा समोरील रोडवर आले. त्यावेळी इसम नामे राजेश परळकर, वय 30 वर्षे, रा. कात्रज हा तेथे रिक्षा घेऊन आला. त्याच्याकडे या रिक्षा बाबत प्रवास करताना कळाले की. ती रिक्षा चोरीची असून त्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आले व त्याच्या ताब्यातील रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

Election Commission : राज्यात एकूण 9 कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

अटके दरम्यान आरोपीकडे तपास करताना त्याने आणखीन 7 दुचाकी गाड्या चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे ती सात वाहने पंचनामा करून जप्त करण्यात  आली आहेत.(Pune Crime) भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.