Pune News : वारजे मध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात पप्पू भाई व त्याच्या साथीदारांनावर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : वारजे मध्ये दहशत माजवणाऱ्या (Pune News) कुख्यात पप्पू भाई व त्याच्या साथीदारांनावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

27 नोव्हेंबर 2022 रोजी पप्या उर्फ वैभव उकरे व त्याच्या 8 ते 9 साथीदारांनी आकाश नगर जुना जकात नका, वारजे, पुणे येथील फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीच्या भावासोबत झालेला जुनावाद उकरून  काढून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जीव घेण्याच्या उद्देशाने मोठा दगड फिर्यादीच्या दिशेने मारला. त्याचा राग धरत पप्या उर्फ वैभव भोकरे यांनी तोच दगड फिर्यादीच्या मोटरसायकलवर परत मारून मोटरसायकलचे नुकसान केले. तसेच वैभव उकरे यांनी त्याच्याबरोबर असलेल्या आठ ते नऊ साथीदारांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली.

” पप्पू भाई हा इथला भाई आहे”, असे म्हणून “पप्पू भाई च्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन” असे म्हणून परिसरात दहशत पसरवली.

Pune Crime : मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे दोघे गजाआड; एक रिक्षा, 7 दुचाकी जप्त

त्यामुळे फिर्यादी दिलेल्या तक्रारीमुळे पप्या उर्फ वैभव खरे व त्याच्या सोबत असणाऱ्या साथीदारांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात भादवि कलम 304, 427, 336, 337, 504, 506 (2), 143,147, 148, 149, आर्म ऍक्ट  4(25), म. पो. का. क. 37(1)(3)/135, क्रि. लॉ. अमे. ऍक्ट कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी वैभव उर्फ पप्या उकरे, वय 24 वर्षे, रा. वडारवस्ती, कर्वेनगर पुणे, आशुतोष नारायण साठे, वय 19 वर्षे, रा. मु. पो. कुळे, ता. मुळशी सध्या रा. कर्वेनगर आणि गणेश माने, वय 22 वर्षे,  आकाश नगर, वारजे यांना अटक करण्यात आले आहे. ते सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह मध्ये आहेत. तसेच विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले होते.

या आरोपींकडे सखोल तपास केला असता आरोपी वैभव उर्फ पप्या उकरे (टोळीप्रमुख ) हा पुण्यामध्ये काही सामायिक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन गुन्हे करीत (Pune News) असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या बाबतचा प्रस्ताव डी एस हाके वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांनी सोहेल शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पुणे शहर यांच्यामार्फतीने राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे त्यांना सादर केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.