Pimpri News : तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट”स्पर्धेत  इंदिरा औषधनिर्माण कॉलेज विजयी

एमपीसी न्यूज – डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालने “तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” सामन्यांचे पुणे विभागातील फार्मसी महाविद्यालयांच्या प्राध्यापक (Pimpri News) व प्राध्यापकेत्त्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजन केले होते. या स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा औषधनिर्माण महाविद्यालयास डॉ.डी.वाय.पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

“तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” मध्ये सामान्यात उप विजेते पदाचा चषक डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालय यांनी मिळविला. तर मॅन ऑफ दि मॅच डॉ.आमिर शेख (इंदिरा कॉलेज), बेस्ट बॉलर डॉ. राहुल बुचडे(इंदिरा कॉलेज) बेस्ट बॅटमॅन  पवन माने (डी. वाय. पाटील कॉलेज आकुर्डी) यांनी पटकावले.

Pune News : वारजे मध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात पप्पू भाई व त्याच्या साथीदारांनावर मोक्का अंतर्गत कारवाई

स्पर्धेत प्राथमिक चाचणीनंतर परिसरातील 6 महाविद्यालयांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक डॉ. वैभव वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत सर्व उपस्थित पाहुण्याचे आणि संघांचे स्वागत केले. “तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट”चे  उदघाटन डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलचे संचालक रिअर ॲडमिरल(नि)  अमित विक्रम  यांच्या हस्ते करण्यात आले .

“तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट”च्या आयोजनासाठी डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे  क्रीडा प्रभारी डॉ. वैभव वैद्य , मुकेश मोहिते , डॉ. संकेत कदम यांनी परिश्रम घेतले. (Pimpri News) यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील, आकुर्डी संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी सर्व विजयी व उपविजयी संघांचे अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.