Prakash Amte : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली समाजसेवक प्रकाश आमटे यांची हॉस्पिटलमध्ये भेट

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुणे दौरा केला. त्यातच त्यांनी वेळ काढून ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे (Prakash Amte) यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेतली. सोबतच आमटे कुटूंबिय आणि डॉक्टरांशी संवाद साधला.

Pune News : गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे सध्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आहेत. त्यांना 29 जुलै रोजी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्यात बऱ्याच वरिष्ठ व्यक्तींना भेटी देत आहेत. त्यांनी प्रकाश आमटे यांचीही भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आमटे कुटूंबिय आणि डॉक्टरांशी संवाद साधत उपचारांसंदर्भातील माहिती घेतली. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या देहबोलीतून जाणवला. आमटे संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, अशी मला आशा, नव्हे खात्री आहे. शेकडो वंचिताचे (Prakash Amte) आयुष्य वाचविणारे डॉक्टर या संकटातून नक्की बाहेर येतील. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना, असे वक्तव्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.