PCMC News : महापालिकेचा सर्वेअर एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (PCMC News) सर्वेअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Hinjawadi : बनावट कस्टमर केअर सेंटरवर पोलिसांचा छापा

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप लबडे असे लाच मागणाऱ्या सर्वेअरचे (PCMC News) नाव आहे. नगररचना विभागात लबडे हे सर्वेअर  म्हणून कार्यरत आहेत. लबडे याने एकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती.याबाबत एका 38 वर्षीय पुरुषाने तक्रार दिल्याने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे विकास योजनेचा अभिप्राय (डी.पी.ओपिनियन) देण्यासाठी प्रथम 3,50,000/- रु. व तडजोडीअंती 3,00,000/- रुपयांची लाच मागीतली म्हणून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती पवार, पोलीस उपअधीक्षक, श्रीराम शिंदे, पोलीस निरीक्षक, प्रवीण निंबाळकर, पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याची तक्रारी एसीबीकडे करण्यात आली होती. एसीबीने आज (बुधवारी) सापळा रचून लबडे याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.