Pimpri : तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानात दुपारी तीन वाजता हे महासंमेलन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकुर,शिरुर विधानसभा आमदार बाबुराव पाचर्णे, हडपसर विधानसभा आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित राहणार आहे.

येणा-या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात आपली ताकद दाखवून देतील. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीतून फुटवा अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार तीन नोव्हेंबरच्या सभेच प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.