Pimpri : मुख्यमंत्र्यानी दिले पंतप्रधान आवास योजनेच्या चौकशीचे आदेश

आमदार गौतम चाबुकस्वार यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाचा डीपीआर जाणीवपूर्वक चुकीच्या पध्दतीने तयार केल्याबद्दल संबंधित अधिका-यावर कारवाईची मागणी शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुस-यांदा केली आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित विभागास दिले आहे.

करदात्या जनतेच्या पैशावर अधिकारी, सल्लागार व पदाधिकारी एक प्रकारे डल्ला मारण्याचा प्रकार करीत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करुन त्याला जबाबदार असलेले अधिकारी व सल्लागांरावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकजे केली आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यानी या तक्रारीवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश संबंधित विभागास दिले आहे, अशी माहिती आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली.

या तक्रारीनंतरही प्रत्यक्ष कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र देऊ. त्यानंतरही कारवाई न झाल्यास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.