Pimpri : पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात फार्मासिस्ट डे साजरा 

एमपीसी न्यूज –  जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   

चाणक्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वा.सी.एम.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ औषध निर्माण अधिकारी दत्तात्रय माने, वसुधा पाटील आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

जागतिक फार्मसिस्ट डे निमित्त नारायण जायभाय, विद्या किनेकर, सुखदेव गडगे, मिलिंद पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मनोज देशमुख म्हणाले, फार्मासिस्ट हा आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व रुग्ण यामधील किती महत्वाचा दुवा आहे. याबाबतचे महत्व पटवून दिले. तसेच फार्मसिस्ट यांनी बाजारात येणारी नवनवीन औषधांची माहिती घेऊन ज्ञानात भर घालावी व आपले ज्ञान अद्ययावत करावे याबाबत सर्व फार्मासिस्ट यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार राजेंद्र गाडेकर यांनी  केले. तानाजी गवंड, विनोद जगताप, गजानन गायकवाड आदींनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.