Chikhali: 18 मीटर रुंदीचा डीपी रस्ता विकसित करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील नाशिक महामार्ग ते गट क्रमांक 1062 पर्यंतचा 18 मीटर रुंदीचा डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रभाक क्रमांक दोन चिखली गावठाणातील नाशिक महामार्ग ते गट क्रमांक 1062 पर्यंतचा 18 मीटर रुंदीचा डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती. निविदा रक्कम 12 कोटी 7 लाख रुपये होते. निविदा प्रक्रियेत एच.सी. कटारिया, अजवानी इफ्रा आणि श्री गणेश कन्स्ट्रक्शन या तिघांनी सहभाग घेतला.

त्यापैकी एच.सी.कटारिया या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 12 कोटी 7 लाखामधून रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेस वगळून 11 कोटी 89 लाख पेक्षा 9.63 टक्के कमी दराची आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 23 डिसेंबर 2019 रोजी त्यांची निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार निविदा मंजूर दराने रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेससह 10 कोटी 93 लाख रुपयांपर्यंत काम करुन घेण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास बुधवारी स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.