Chikhali Business News: लेगसी रिव्हरसाईड; देहू-आळंदी रस्त्यावर चिखलीतील भव्य गृहप्रकल्प

एमपीसी न्यूज – लेगसी रिव्हरसाईड, एक अनोखा गृहप्रकल्प तुम्हाला तुमच्या स्वप्नातील आयुष्य जगण्याची संधी देत आहे. वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सहा यशस्वी प्रकल्प तयार करणाऱ्या लेगसी ग्रुपने खास ग्राहकांसाठी या रिव्हरसाईडची निर्मिती केली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार करण्यात आलेला लेगसी रिव्हरसाईड गृहप्रकल्प चिखली येथे अत्यंत दिमाखात साकारला आहे.

दोन, तीन बीएचके घर आणि शॉप्स

दोन, तीन बीएचके घर आणि दुकाने असलेला प्रकल्प तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाईल. याच्या अत्यंत कुशलतेने तयार केलेल्या वातावरण संतुलित आणि दुहेरी बाल्कनीच्या घरातून मनमोहक असे जलाशयाचे दर्शन होणार आहे.

वास्तूचे बांधकाम हे अत्यंत मजबूत असून घर, दुकाने हे इंटरकॉमने जोडलेली आहेत. तसेच आतंरराष्ट्रीय शाळा, रुग्णालये, डी-मार्ट हे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.

भोसरी आणि चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्कला सोईस्कररीत्या जोडलेला रिव्हरसाइड हा एकमेव गृहप्रकल्प आहे.

भविष्यातील निवारा, खरा आनंदलेगसी गृहप्रकल्प तुम्हाला देत आहे एक आधुनिक सोईसुविधायुक्त भविष्यातील निवारा. लेगसी रिव्हरसाईड गृहप्रकल्पात तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्याशी निगडीत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

इंटरकॉम, आऊटडोअर जीम, मैदान, ऑटोमॅटिक लिफ्ट, प्रौढांसाठी बैठक व्यवस्था, मनमोहक वृक्षलागवड,  मुलांसाठी रबर मॅटिंग प्लेग्राउंड, जनरेटरवर  आधारित लिफ्ट यांसारख्या अनेक गोष्टी यात देण्यात आल्या आहेत.

लेगसी ग्रुपने आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीशी अगदी विचारपूर्वक जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला या गृहप्रकल्पात खरा ऐशोआराम, शांतता, सुरक्षा, समाधान, आनंद अनुभवण्यास मिळणार आहे. आपल्या कुटुंबासोबत मन, शरीर, आत्म्याने एकसंध होण्यासाठी रिव्हरसाईड ही एकमेव निवड असणार आहे.

स्वप्न, ओळख, भविष्य घडवण्याची ताकद

हे फक्त एक घर नाही तर ही एक अशी जागा आहे जी तुम्हाला सुखी जीवनाकडे घेऊन जाईल. याच्या भव्य 3 बीएचके घरात तुमचे स्वप्न, ओळख, भविष्य घडवण्याची ताकद आहे.

सुंदर अशा लोभनीय वास्तूकलेचा केलेला उपयोग, सुसंगत सोईसुविधेचा केलेला वापर यामुळे एक परिपूर्ण जगच येथे उभारले आहे. वास्तूच्या रचनेमुळे या परिसरातील सुर्यप्रभात आणि संध्याकालचा चंद्र याचे मन तृप्त करणारे दृष्य पाहावयास मिळतात.

कुटुंबातील सदस्यांच्या गरजेनुसार रचना

धकाधकीच्या जीवनात सुखाचा एक क्षण मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. लेगसी रिव्हरसाइडने खास आपल्या ग्राहकांना जगण्याचा आनंद घेण्यासाठी सुखकारक परिसराची निर्मिती केली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा लक्षात घेत अत्यंत सुविधायुक्त प्रकल्पाची रचना येथे केली आहे.

विविध प्रकारच्या सोईसुविधा, सुंदर अश्या गवताची चादर पसरलेली प्रशस्त बाग, मुलांसाठी खेळणी, ओपन जीम या आणि अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या तुम्हाला आनंद, सुख, आरामदायीपणा, विलासी आयुष्य जगण्याची अनुभुती देईल.

सुखी जीवनाचा समतोल

लेगसी रिव्हरसाईड गृहप्रकल्प तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडीत खूपसाऱ्या गोष्टींशी जोडण्यासाठीच उभारला आहे. अत्यंत अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक निवडलेल्या स्थळामुळेच तुम्हाला तुमचा अमुल्य वेळ खर्च न करता कुटुंब आणि बाहेरील जग यांच्यात ताळमेळ घालणे सोपे झाले आहे.

दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या गोष्टी, किराणा, हॉटेल, विविध छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सतत लांबचा प्रवास करण्याची गरज नाही. शॉपिंगचा खरा आनंद तुम्हाला येथे घेता येईल.

शहरातील गर्दी, ट्राफिक, गोंधळाचा लवलेश नसलेल्या जागी तुम्हाला तुमच्या सुखी जीवनाचा समतोल राखता येईल.

सिटी प्राईड स्कूल, डी-मार्ट, तळवडे आयटी पार्क, एसएनबीपी स्कूल, मुंबई-पुणे हायवे, चाकण भोसरी एमआयडीसी, प्रियदर्शनी स्कूल यासारख्या गोष्टी अगदी दहा मिनटांच्या अंतरावर आहेत.

खास  वैशिष्ट्ये :

• आरसीसीची रचना, आतून बाहेरून सिमेंट वीटाची संरक्षण भिंत, ग्रॅनाईट खडकाचे किचन, स्टेनलेस स्टील सिंक यात देण्यात आला आहे.
• बाथरूममध्ये भिंतीतून प्लंबिंग केलेली आहे.  सिरॅमिक, मार्बल, ग्रॅनाईटचे फ्लोअरिंग आणि दरवाजे देण्यात आले आहे.
• क्रोम प्लेटेड  फिंटिंग केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आगविरोधी  यंत्रणेची सुविधा संपूर्ण प्रकल्पात देण्यात आली आहे.

खास वर्क फ्रॉम होम जागेची व्यवस्था

कोरोना परिस्थितीमुळे तुमच्या कुटुंबाचे स्वास्थ आणि सुरक्षा याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. यामुळेच लेगसी रिव्हरसाईडने भविष्याचा विचार करूनच तुमच्यासाठी खास वर्क फ्रॉम होम जागेची व्यवस्था या गृहप्रकल्पात केली आहे.

प्रशस्त अशा 3 बीएचकेमध्ये एकाच छताखाली वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

लेगसी रिव्हरसाईडच्या कमी बजेट, अत्यंत कमी देखभाल खर्च, शाळा, रूग्णालये, शॉपिंग सेंटर, विविध सोखसोई असणाऱ्या गृहप्रकल्पात ग्राहकांची पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे.

साईट :
सन प्रॉपर्टीज
गट क्रमांक : 94, एसएनबीपी स्कूल जवळ, देहू- आळंदी रस्ता,
चिखली, पुणे – 411 114.
फोन क्रमांक : 88055 44888
महरेरा क्रमांक : P 52100025012
वेबसाइट : www.legacypune.in

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.