Chikhali : केमिकल साहित्य ठेवलेल्या भंगार गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज – भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साहित्य होते. ही घटना आज, रविवारी (दि. 22) सकाळी चिखली-आळंदी रोडवर घडली.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रोडवर चिखली येथे भंगारचे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साहित्य ठेवण्यात आले आहे. रविवारी सकाळी अचानक गोडाऊनला आग लागली. यामध्ये गोडाऊन मध्ये ठेवलेले सर्व साहित्य जाळून खाक झाले.
अग्निशमन विभागला घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

जनता कर्फ्यू असल्याने शहरातील सर्व नागरिक आपापल्या घरात बसले आहेत. जनता कर्फ्यूचे पालन केल्याने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच नागरिकांची गर्दी न झाल्याने अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळविण्यास जास्त अडचणी आल्या नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.