Chikhali : दारुड्या जावयाचा सास-यावर कोयत्याने वार!;जावयाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जावई काहीही कामधंदा करीत नाही. तसेच त्याला दारूचे व्यसन आहे, म्हणून सासरे आणि त्यांचे दोन भाऊ जावयाला समजावत असताना जावयाने सास-यावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री सव्वा अकरा वाजता रुपीनगर, तळवडे येथे घडली.

पाशा इस्माईल शेख (वय 57, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी सास-याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जावई अस्लम उस्मान शेख (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अस्लम हा फिर्यादी शेख यांचा जावई आहे. तो काहीही कामधंदा करीत नाही. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. दारू पिऊन तो शेख यांच्या मुलीला त्रास देतो. त्यामुळे फिर्यादी शेख आणि त्यांचे दोन भाऊ रविवारी रात्री अस्लम याला समजावण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यावेळी ‘तू माझ्या घरी येऊन मला समजावणार का?’ असे म्हणून अस्लम याने शेख यांना धमकी दिली.

त्यानंतर शेख घरी जाण्यासाठी निघाले असता अस्लम याने पाठीमागून येऊन शेख यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये शेख जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.