Sangvi : ‘इंस्टाग्राम’वरून अश्लील मेसेज आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा; पतीला अटक

एमपीसी न्यूज – पती-पत्नीने आपसात संगनमत करून एका तरुणीला इंस्टाग्रामवरून अश्लील मेसेज तसेच शिवीगाळ केली. हा प्रकार 29 ते 31 जानेवारी दरम्यान शितोळेनगर जुनी सांगवी येथे घडला. सांगवी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मोहित जोधपूरकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पूजा मोहित जोधपूरकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहित याने एका ‘इंस्टाग्राम’ अकाउंटवरून फिर्यादी तरुणीला वारंवार अश्लील मेसेज केले. तसेच त्याची पत्नी पूजा हिने देखील एका इंस्टाग्राम अकाउंटवरून फिर्यादी तरुणीला अश्लील शिवीगाळ केली.

याबाबत तरुणीने पोलिसात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.