Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिशन तर्फे रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Pimpri ) यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती बुधवारी (दि. 7) पिंपरी न्यायालयातील बार रूममध्ये साजरी करण्यात आली. रमाई यांना विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रमाई वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या (Pimpri )पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाई होत्या. यावेळी ज्येष्ठ विधज्ञ ॲड. जे के काळभोर, ॲड मुकुंद ओव्हाळ यांनी रमाई यांच्या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ॲड. संजय जाधव, ॲड. भोंडे ॲड. अरुण खरात, ॲड. बी के कांबळे, ॲड. पदामावती पाटील, ॲड. पुनम शर्मा, ॲड. संगिता कुशलकर, ॲड. सी एम माने, ॲड. निलेश टिळेकर, ॲड. अतुल कांबळे, ॲड. प्रताप साबळे, ॲड. नारायण थोरात, ॲड. प्रतिक जगताप, ॲड. कुलदीप बकाल यांनी शब्दरूपी अभिवादन केले.

Chinchwad : पुण्याहून अयोध्येला निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट,प्रवाश्यांमध्ये एकाच गोंधळ

प्रथम महिला अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे म्हणाल्या, “माता रमाई यांनी वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. त्यांनी बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्या. रमाई आंबेडकर यांचा खडतर प्रवास सांगताना अध्यक्षा भावनिक झाल्या. अशाप्रकारे प्रत्येक महिलांनी रमाईचे गुण अंगीकृत करावे अशी भावना अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे यांनी व्यक्त केली.

यावेळी उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, ॲड. ऐश्वर्या शिरसाठ, ॲड. तेजस चवरे, ॲड. विशाल पौळ, ॲड. सागर अडागळे, ॲड. प्रशांत भडकुंभे, ॲड. हर्षद ओव्हाळ, ॲड. सूर्यकांत शिंदे, ॲड. विनोद आढाव, ॲड. रोहीत भोसले, ॲड. महेश गायकवाड आदी उपस्थीत होते. सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे यांनी केले. ॲड. विशाल पौळ यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.