Chikhali : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका तरुणाने बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी तरुणावर (Chikhali) गुन्हा दाखल करत त्याच्याकडून 28 हजारांची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहा वाजता ताम्हाणे चौक, चिखली येथे करण्यात आली.

ऋषिकेश आप्पाराव क्षीरसागर (वय 20, रा. काळेवाडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कबीर पिंजारी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले, एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश याने त्याच्या ताब्यात 28 हजार 475 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू विक्रीसाठी बाळगली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी कारवाई करत दारू जप्त केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.