New Year 2024 : नवे वर्ष आणि संकल्प 2024

एमपीसी न्यूज  -नवे वर्ष, नवा हर्ष, नवी दिशा , नवी आशा, नवा उत्साह , नवे प्रयत्न , नवीन आकाश , नवीन प्रकाश , (New Year 2024  )जीवनाचा नवा अध्याय , अशा विविध अंगानी येणारे हे नवे वर्ष आपण प्रत्येक जण ज्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत तो क्षणजवळ आलाय.

खर तर सुरुवात, मध्य आणि शेवट …. आणि पुन्हा शेवटानंतर सुरुवात … मध्य … आणि शेवट … ह चक्र सतत चालू राहते … बदलत राहतात ते म्हणजे वेळ , परिस्थिती, आणि आपल्या मनातील संकल्प … आपले प्रयत्न … हो कि नाही ! प्रत्येक वर्ष येते आणि जाते महत्वाचे हे आहे कि आपण या पूर्ण वर्षात काय कमावले आणिकाय गमावले ? काय शिकलो आणि काय शिकवले ? काय केले आणि काय करायचे राहून गेले असे असंख्य प्रश्न ?

तसा प्रत्येक दिवस हा नवा उत्साह नवीन अशा घेऊन येणारा असतो … तसेच येणारे हे वर्ष आपणाला खूप काही देऊनजाणारे , शिकवणारे . आणि खूप काही कमवून देणारे असेल यात शंका नाही. पण यासाठी जोड हवी ती आपल्याप्रयत्नांची, संकल्पनांची , जिद्दीची आणि मनात बांधलेल्या पक्क्या विश्वासाची … एका सुंदर नात्यावर पू. ल.
देशपांडे म्हणतात कि , मैत्री एक सोपी व्याख्या आहे , रोज आठवण यावी , अस काही नाही , रोज भेट व्हावी असहीकाही नाही , एवढंच कशाला रोज बोलणं हव असही काही नाही , पण मी तुला विसरणार नाही , हि झाली खात्री आणितुला याची जाणीव असण हि झाली मैत्री .

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसन महत्वाच … हे ज्यांनीजाणलं त्यांनी माणसाच माणूसपण जाणल. आता तुम्ही म्हणाल नव वर्ष आणि पू. ल. देशपांडे यांच्या या मैत्री वरीलवाक्याचा काय संबंध …. आहे ना यातील शेवटचे वाक्य महत्वाचे माणूसपण … आपण जन्माला येणे आणि मृत्यूयामधील जी दरी आहे ती आपण जीवन जगत असताना भरून काढतो ते आपल्या कार्यातून..आपल्या कर्तृत्वातून …शेवटी तुम्ही कसे होता , काय केले आणि तुमचे कर्तृत्व काय होते. हे महत्वाचे. तुमच्या जवळ पैसा किती होता,बंगला, गाडी इत्यादी ची विचारपूस नाही होत. तर एक माणूस म्हणून तुम्ही कसे होता हे पाहिले जाते.

नवे वर्ष आले कि आपण नवं संकल्प करत असतो , त्याचबरोबर नेहमी हे ठरवतो कि आपणास वर्तमानात जगायचे आहे, भूत आणि भविष्याचा विचार करायचा नाही. पण असे होते का ? नाही होत. यावरच एक उत्तम विचार ऐकायलामिळाला. “आपण दही लावताना जुन्या, आंबट आणि खराब झालेल्या दह्याचं विरजण लावत नाही. कारण नवीनदही सुद्धा खराब होऊ शकत. त्याचप्रमाणे आपण मागील वर्षातील आंबट, कडू आठवणी मनात ठेवून नवीन वर्ष सुरुकरू नका.

 

पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा.” एकदम भारी विचार आहे ना ! पण आपण कितीही नाही म्हटलं तरीअश्या आंबट आठवणी आपण काढतच असतो. आपल्या मनात अशा नकोशा आठवणी असतातच आणि आपण त्याआठवणी पुढच्या वर्षात घेऊन येतच असतो . थोडक्यात काय त्याला आपण कॅरी फॉरवर्ड करतोच.

पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा हे म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात असं वागणं शक्य आहे का? जुन्या आठवणी पाठसोडत नाहीत आणि त्या नकोशा देखील वाटतात. त्या आठवणी विसरून त्या त्या व्यक्तींशी पुन्हा नॉर्मल वागणंइतकं सोप नाही. कारण आपण सामान्य माणस आहोत. राग येण, तो मनात राहणं स्वाभाविक आहे. पण यासामान्य वाटणाऱ्या भावना मनाला खूप त्रास देतात. त्या व्यक्तीला माफ करण शक्य नसेल तर निदान द्वेषथांबवता येईल का? कारण कोणतीही व्यक्ती कायम तशीच नसते. परिस्थिती प्रमाणे माणसात बदल होतो.

या निमित्ताने अजून एक मस्त विचार मिळाला, ठराविक लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही की आपला आदर करत नाहीत असंं वाटतंं. आपण ते स्वीकारत नाही, कि त्याचेही विचार आहेत. पण हे डोक्यात जाऊन बसतं की हीव्यक्ती माझ्या अपेक्षे प्रमाणे वागत नाहीये. आपल्या मनाप्रमाणे वागले की आपणास आदर मिळाला असे वाटते.
खरं तर मन कमजोर असल की अहंकार असतो आणि आत्मसन्मान कमी होतो. ती व्यक्ती लवकर डिस्टर्ब होते.

संवेदनशील असणं वेगळं, जी व्यक्ती संवेदनशील असते ती लगेच दुःखी होते आणि पटकन त्याची प्रतिक्रिया देते,असं आजकाल बोलल जात. पण मन स्थिर नसेल तर त्यामुळे असं घडतं. जेव्हा दुसऱ्याच्या वागण्यावर माझा आनंदअवलंबून आहे असे आपण गृहीत चालतो तिथेच तर प्रोब्लेम्स सुरु होतो. कारण माझा आनंद मी माझ्यात मिळवूशकत नाही. त्यामुळे आपण दु:खी होतो.

आपला मान आणि अपमान आपण ठरवायचा. आत्म्याची ताकद वाढली कीआत्मविश्वास वाढतो आणि आत्मसन्मान वाढतो. माणसाच्या आयुष्यात सहन न होणारी दु:ख फार कमी असतात.

बाकी सगळे प्रश्न आपण ओढवून घेतो. रोजच्या गोष्टीनी आपण लगेच चिडतो आणि त्याला मोठ करतो, दु:खी होतो.आपण आपला आनंद टिकवण्यासाठी आपलं मन आनंदी ठेवायचं आणि एखादी अशी व्यक्ती आपल्या सहवासातआली जिचं मन कमजोर आहे आणि त्यामुळे ती रागवते, चिडचिड करते असं लक्षात आलं तर त्रास करून घ्यायचा नाही.

कारण आपला आनंद आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे बघा किती सोप्पंं आहे, आपल्याला राग आला तर आपलं मन कमजोर आहे आणि समोरच्याला राग आला तर त्याचं मन कमजोर आहे. या दोन्ही केसमध्ये चूक कोणाचीही नसल्यानी आनंद कमी होणे न होणे … त्यावर अवलंबून नाही.

तेव्हा महत्वाचे आपण या वर्षांपासून तरी संकल्प न करता प्रॅक्टिकली तसे वागून बघू या ! कारण केलेले संकलप पूर्ण होतातच असे नाही. तेव्हा जे काही करायचे आहे ते आपल्या आचार, विचार आणि उच्चार यातून त्याची अंबलबजावणी करू या ! असे म्हणतात कि , “प्रयत्नवादाची कास सोडू नका, काहीतरी ध्येय समोर ठेवा , केवळ
जन्माला आलो म्हणून जगलो याला काही अर्थ नाही जन्माचं सार्थक होईल असे काही तरी करा.”

प्रॅक्टिकली करणे अवघड असले तरी आपण प्रयत्न नक्की च करू शकतो आणि मग बघा तुम्हाला किती मोकळे आणि हलके वाटेल.चला तर 2024 चे स्वागत आपण आपल्या कृतीतून करू या ! सर्वाना नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

डॉ. रिता शेटीया

लेखिका रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका आहेत..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.