Chikhali Crime News : हातपाय बांधून गळा आवळून महिलेचा खून

एमपीसी न्यूज – पतीसोबत मतभेद असल्याने एकट्या राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. या महिलेचा मृतदेह हातपाय बांधलेल्या आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत गुरुवारी (दि. 5) सकाळी हरगुडेवस्ती, चिखली येथे आढळला.

कमल बाबूराव खाणेकर (वय 55, रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने कमल यांचा गळा आवळून निर्घृणपणे खून केला. गुरुवारी सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांना आवाज दिला. मात्र कमल यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजाऱ्याने घरात जाऊन बघितले. त्यावेळी कमल यांचे हातपाय बांधलेल्या आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

शेजाऱ्याने घटनेची माहिती लगेच चिखली पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यात कमल यांचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. खुनाचे कारण अद्याप कळले नाही.

एकट्याच राहत असलेल्या कमल यांनी स्वत:च्या काही खोल्या आणि दुकाने भाड्याने दिली आहेत. त्यातून त्यांना दरमहा 40 ते 50 हजार रुपये भाडे मिळत होते. त्यांच्याकडे दोन कार आहेत. भटक्‍या कुत्र्यांना त्या चिकन खाऊ घालत होत्या. कुत्र्यांसाठी त्यांनी बुधवारी दोन ते तीन किलो चिकन आणल्याचे आढळून आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.