Chikhali : लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. महिला गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एकावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकऱणी पिडीतेच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोनु यादव (रा. उत्तरप्रदेश पुर्ण नाव माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनु यादव याने 18 वर्षीय पिडीतेला फुस लावून तिचे अपहरण केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित महिला गर्भवती झाली. त्यानंतर तिने हा प्रकार घरी सांगितला. लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.