Pimpri : तीन मोबाईल चोरांकडृून 50 मोबाईल जप्त

तीन पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघड; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनीट दोनच्या तपासी पथकाने तीन सराईत मोबाईल चोरांकडून एकूण 50 मोबाईल जप्त केले.  या गुन्हेगारांकडून तीन पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

सतीश निवृत्ती कोळसुरे (वय 26, रा. आकुर्डी), नागेश नवनाथ हनवते (वय 19, रा. शिवाजीनगर), सौरभ मोहन कदम (वय 19, रा. शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • गुन्हे शाखा युनीट दोनच्या तपासी पथकाने दोन स्वतंत्र टीम तयार करून तपास केला असता, पोलीस नाईक फारुक मुल्ला आणि जमीर तांबोळी यांना मिळालेल्या माहितीवरून आकुर्डी येथील बीजलीनगर पुलाजवळ चोरी केलेले फोन विकण्यासाठी आरोपी सतीश येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून सतीशला अटक केले. तर पोलीस हवालदार प्रवीण दळे पोलीस नाईक नितीन बहीरट, नारायण जाधव आणि चेतन मुंडे हे गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की बावधन येथे चोरीचे फोन विक्रीसाठी दोघेजण आले आहेत.

त्यानुसार सापळा रचून नागेश व सौरभ यांना ताब्यात घेतले. यावेळी सतीष कडून 37 तर नागेश व सौरभ यांच्याकडून 13 मोबाईल असे एकूण 50 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तर गुन्हयामध्ये वापरलेली दुचाकी असा एकूण 3 लाख 51 हजार 800 रुपये किंमतीचा एवज जप्त केला आहे. तिघांवर असलेले निगडी, देहुरोड, हिंजवडी येथील मोबाईल चोरीचे सहा गुन्हे उघड झाले आहेत.

  • ही कारवाई गुन्हे शाखा युनीट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, प्रवीण दळे, मयुर वाडकर, नारायण जाधव, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदिप ठाकरे, लक्ष्मण आढारी, संपत निकम, राहुल खारगे, चेतन मुंढे, संजय गवारे, धर्मराज आवटे, संजय शिंदे, हजरत पठाण यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.